
मुंबई : मागील काही काळापासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्यात संघर्ष सुरू आहे. दरम्यान मागच्या आठवड्यात बाप्पा गणरायाच्या दर्शनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अमित शहा हे मुंबईत येऊन गेले. यावेळी त्यांनीं अनेक गोष्टींवर भाष्य करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तर दुसरीकडे भाजपने मिशन बारामती देखील सुरु केले असल्याचं देखील अमित शहा म्हणाले होते. दरम्यान यावर आता शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामानातून भाजपाला प्रत्युत्तर दिलं आलं आहे.
काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात ?
‘‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला गाडण्याची व उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्याची भाषा केली. मुंबईवर ताबा मिळवायचाय पण आता नाही तर कधीच मिळवता येणार नाही. शिवसेना फोडली कशासाठी? त्या विषालाच यानिमित्ताने उकळी फुटली. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होणे नाही, पण शिंदे गटाने तर सुंताच करून घेतली! मात्र श्री. शहा यांनी हे असे बोलत राहावे. मऱ्हाठा नक्की उठेल!
Dadar: दादरमध्ये शिवसेना विरुद्ध शिंदे गटात राडा, गोळीबारात एक पोलीस जखमी
सध्या शिवसेना व ठाकरे घराण्याची अप्रतिष्ठा करण्याची शर्यत लागली आहे. उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्याविरुद्ध कोणताही माल खपवायचा हा धंदा सुरू झाला आहे व त्याची एजन्सी भाजपचे पुढारी वाटत सुटले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गणपती दर्शनासाठी मुंबईत आले व त्यांनी शिवसेना द्वेषाचे प्रदर्शन केले. ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांसमोर त्यांनी बंद दाराआड भाषण केले. ते सार्वजनिक झाले. विषाला उकळी फुटावी असे त्यांचे वक्तव्य आहे.
मुख्य म्हणजे त्यांचे भाषण हे कृतघ्नतेचे टोक आहे. त्यांनी भाषणात सांगितले, शिवसेनेला गाडून मुंबईवर ताबा मिळविण्याची हीच संधी आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ‘उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला व त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी. भाजप शिंदे यांच्या गटाबरोबर आहे व राहील. उद्धव ठाकरे यांना आता संपवायलाच हवे.’ श्री. अमित शहा यांना त्यांचे राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाहीने हा अधिकार सर्वांना दिला; पण भाजप व त्यांचे नेते लोकशाही मार्गाने जात आहेत काय? हा प्रश्न आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ अस्थिर करून देशाचे नियंत्रण काही मंडळींनी हातात घेतले आहे. त्यांनी एका बाजूला ‘मिशन मुंबई’ तर दुसऱ्या बाजूला ‘मिशन बारामती’चे षड्डू ठोकले आहे.
Shinde-Fadnavis: ओबीसी शिष्यवृत्ती बंद! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खतम करायचे व तोतयांच्या हाती हे राज्य सोपवायचे, मुंबईचा सरळ घास गिळायचा असा हा कट शिजला आहे. अमित शहा यांनी ते स्पष्टपणे बोलून दाखवले!अमित शहा व भाजपचे ‘मिशन मुंबई’ काय आहे त्याचा भयंकर चेहरा उघडा पडला. अमित शहा व त्यांच्या लोकांनी अशा प्रकारची भाषणे पुनःपुन्हा करीत राहिली पाहिजेत. त्यातूनच जनमनाचा उद्रेक होईल.
शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी मुंबईवर नियंत्रण मिळविण्याचे ठरवले आहे. 2014 साली शिवसेनेने दोन जागांवरून भाजपशी असलेली युती तोडली असा ठपका शहा ठेवतात. मग 25 वर्षांची दोस्ती टिकविण्यासाठी भाजप दोन पावले (जागा) मागे का गेली नाही? बरं, पुढे शिवसेनेबरोबरच सरकार स्थापन झाले. शिवसेनेने लोकसभेत एकत्र यावे म्हणून अमित शहा ‘मातोश्री’वर आले होते व त्यांच्या समोर सत्तेचे वाटप समसमान झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर जाहीर केले होते. त्याच वेळी अमित शहांनी श्री. फडणवीस यांना थांबवले असते तर बरेच झाले असते. म्हणजे धोका कोणी कोणास दिला यावर आजचे साक्षीपुरावे करण्याची वेळच आली नसती.
Varun Sardesai: “उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील या भीतीने भाजपाने शिवसेना फोडली” – वरूण सरदेसाई