Free Food Offer । आधार कार्ड दाखवा अन् फुकट जेवा, ‘या’ हॉटेलमध्ये ‘मनोज’ नावाच्या लोकांसाठी एक मोफत जेवण

Free Food Offer

Free Food Offer । मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे नाव राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत आले आहे. त्यामुळे मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील एका हॉटेल ऑपरेटरनेही एक उत्तम ऑफर सुरू केली आहे. त्यामुळे या ऑफरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. कारण या हॉटेलमध्ये मनोज नावाच्या व्यक्तीला थेट मोफत जेवण दिले जात आहे. मात्र, त्यासाठी एक अटही ठेवण्यात आली आहे.

Mumbai News । मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान रडा

या नावाच्या व्यक्तीला मोफत अन्न मिळेल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. सध्या महाराष्ट्रात क्वचितच कोणी असेल ज्याला मनोज जरांगे हे नाव माहित नसेल. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील अनेकांकडून वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनीही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक विलक्षण ऑफर आणली आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या मनोज नावाच्या व्यक्तीला मोफत जेवण देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र यासाठी मनोज नावाच्या व्यक्तीला आपले आधार कार्ड सोबत आणावे लागेल, अशी अट ठेवण्यात आली आहे.

Sharad Pawar । ‘त्या’ भेटीनंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य, म्हणाले; “तुम्हाला लवकरच…”

या हॉटेलमध्ये ऑफर उपलब्ध

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड गावाजवळ अमृत हॉटेल आहे. या हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने आहेत. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी भोजने यांनी वेगळा उपक्रम सुरू केला आहे. ज्यात त्यांनी सांगितले की, ‘मनोज’ नावाच्या व्यक्तीला आधार कार्ड दाखवून मोफत जेवण दिले जात आहे. त्यांच्या या अप्रतिम ऑफरची परिसरात जोरदार चर्चा आहे.

Sharad Pawar । “माझ्या आयुष्यात असा एकही पंतप्रधान पाहिला नाही…”, मोदींबाबबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

बाळासाहेब भोजने यांनी त्यांच्या हॉटेलबाहेर एक फलक लावला आहे, ज्यावर लिहिले आहे, “ज्या पद्धतीनं मराठा समाजाला अखंड महाराष्ट्रात एकत्र करून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा वाढला.’ विशेषत: मनोज जरांगे पाटील सारख्या योद्ध्याने कोणत्याही राजकीय किंवा अन्य सत्तेच्या पाठिंब्याशिवाय समाजाचे भले करण्याचा निश्चय ध्येय आणि शुद्ध निस्वार्थी वृत्ती असेल तर काय करू शकते हे दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्याला सलाम. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही आमच्या हॉटेल अमृत प्युअर व्हेज पाचोड येथे ‘मनोज’ नावाच्या व्यक्तीला मोफत जेवण देत आहोत.

Pune Crime News । पुण्यात गुन्हेगारी वाढली, वारजे परिसरात अज्ञात गुंडांनी पार्किंगमधील दुचाकी जाळल्या

Spread the love