Shrigonda News । महांडुळवाडी ते खाकीबाबा या श्रीगोंदा ला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेले वर्षभर पासून बंद पडलेले होते. संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते.रस्त्याचे अपूर्ण काम संबंधित ठेकेदार ने निकृष्ट केलेले होते. संबंधित ठेकेदाराचा कामाचा परवाना रद्द करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती.
Jaykwadi Dam Water । सर्वात मोठी बातमी! ‘या’ धरणांमधून जायकवाडीत सोडणार पाणी
बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.डोंगरे साहेब,श्री. वराळे साहेब यांनी संबंधित रस्त्याचे काम हे दुसऱ्या ठेकेदारस देऊन उत्तम प्रतीचे काम पुन्हा सुरू केले आहे.काम करणाऱ्या ठेकेदार श्री.भापकर याना सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीने रस्त्याचे काम व्यवस्थित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे अनेक महिने बंद पडले काम संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाल्यामुळे नागरिकांचे खराब रस्त्याने होणारे हाल बंद होणार असल्यामुळे नागरिकां मधून आनंद व्यक्त होत आहे.
संग्राम देशमुख
(प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,शेतकरी आघाडी)