
Indapur News । सध्या पुणे (Pune News ) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील नीरा आणि भीमा या नद्यांना जोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी एक बोगदा बनवण्यात येत आहे. सध्या हा बोगदात ३०० फूट तयार झाला असून या बोगद्यातून पाणी आपल्या शेतीत आणण्यासाठी दोन शेतकरी या बोगद्यात उतरले होते मात्र शेतकरी बोगद्यात उतरताच त्यांचे संतुलन बिघडले आणि ते खाली कोसळले.
Pune Buffelo farming । पुण्यातील सर्वात मोठा म्हशीचा गोठा, दररोज ३०० लिटर दुध होत संकलित
यानंतर या शेतकऱ्यांचा शोध घेण्यासाठी रात्रभर रेस्क्यू अभियान राबवण्यात आले होते. त्यानंतर या शेतकऱ्यांचा तपास लागला असून दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काझड येथील निरा-भिमा जलस्ठीकरणाच्या बोगद्यात घडली आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल बाबुराव नरोटे आणि रतिलाल बलभीम नरोटे या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. (In Nira-Bhima Reservoir Tunnel at Kazad in Indapur Taluk Farmer Death)
Cabinet Decision । महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मिळणार ‘हे’ लाभ, जाणून घ्या..
याबाबत अधिकची माहिती अशी की, हे दोन्ही शेतकरी बोगद्यातील पाणी शेतीसाठी देण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांना बोगद्यामध्ये विद्युत पंप बसवायचा होता. दोघेजण बोगद्यात उतरले मात्र यावेळी त्यांचे संतुलन बिघडले आणि ते थेट बोगद्यात पडले. या सर्व प्रकरणाची माहिती तेथील स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी ठेकेदार आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क केला.
Tomato Price । टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! वाढले दर, किलोला मिळतोय ६० रुपयांवर भाव
यानंतर ठेकेदाराने मोठी क्रेन बोलावली आणि शेतकऱ्यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत या दोघांचा शोध सुरू होता. यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह शोधण्यास स्थानिक नागरिकासह प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान या घटनेमुळे काझड गावावर मोठी शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने शेतकऱ्यांनी त्या बोगद्यात जाऊ नये असे आव्हान देखील केले आहे.
Tomato Price । टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! वाढले दर, किलोला मिळतोय ६० रुपयांवर भाव