Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde group) असे दोन गट पडले. यानंतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली असून शिंदे गटाची इन्कमिंग सुरू झाली. मात्र आता शिंदे गटाला धक्का बसल्याचे दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी या शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. (Politics News)
माहितीनुसार दिव्यातील भाजप नेत्या ज्योती पाटील, ठाण्याचे आम आदमी पक्षाचे नेते संजय बापेरकर आणि पालघरचे कम्युनिस्ट नेते हरिश्चंद्र कोलाट यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. या तीनही महत्त्वाच्या नेत्यांसह 250 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला खात्री आहे आपण जिंकणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताना माझे पालघरकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र मी लवकरात लवकर पालघर मध्ये देखील येणार आहे. या ठिकाणी दौरे करून मी सर्वांच्या भेटीगाठी घेणार आहेत. आदिवासी समाजाचे जे प्रश्न असतील ते सरकारला समजत नसतील तर जनतेचा आवाज सरकारपर्यंत कसा पोहोचवायचा हे शिवसेनेला माहित आहे. असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
Eknath Shinde । आत्ताची मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली