Bus Accident । अपघाताच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत. अपघात सतत चालूच आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे अपघात होतच आहेत. सध्या देखील सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बसच मागचं चाक निखळल्याने भीषण अपघात झाला आहे. (Solapur Accident News )
सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून या अपघातामध्ये सात ते आठ लोक जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये तीन लोक गंभीर जखमी आहेत. बस सोलापूरहुन नांदेडला जाण्यासाठी पहाटे निघाली होती. मात्र सोलापूर मधील उळे कासेगाव या ठिकाणी एसटी बसचा मागच चाक अचानक निघलं यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस उलटी झाली. यानंतर महामार्गावर रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली आणि हा भीषण अपघात झाला. (Solapur News)
बस मध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून यापैकी तीन प्रवासी गंभीर जखमी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्यास सुरुवात केली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.