Breaking News । भाजप खासदारावर अज्ञात लोकांनी भिरकावला दगड

Breaking News

Breaking News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप खासदार अनिल बोंडे (BJP MP Anil Bonde) यांच्यावर काही अज्ञात लोकांनी दगड मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल बोंडे यांच्यावर अज्ञातांनी दगड भिरकावल्यामुळे त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. (Breaking News)

Alia Bhatt । मोठी बातमी! अभिनेत्री आलिया भट्ट अडकली ‘डीपफेक’च्या जाळ्यात, नको त्या अवस्थेत व्हिडीओ व्हायरल

याबाबत अधिकची माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरांमध्ये मागच्या तीन दिवसापासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान काल या शर्यतीचा शेवटचा दिवस होता. यावेळी या कार्यक्रमाला अनिल बोंडे हे भेट देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी काही अज्ञातांनी मागच्या बाजूने चार-पाच दगड भिरकवले आणि त्यातील एक दगड बोंडे यांच्या खांद्याला लागला.

Sharad Pawar । राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्हावर कोणाचा अधिकार आहे? शरद पवारांच्या वकिलाचा मोठा दावा

या घटनेमध्ये भाजप खासदार अनिल बोंडे यांना थोडीशी दुखापत झाली आहे. या घटनेनंतर बोंडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Bus Accident । भीषण अपघात! धावत्या बसच अचानक चाक निघलं; ८ प्रवाशी जखमी

Spread the love