Mohammed Shami । कार दरीत कोसळताच स्टार गोलंदाज मोहम्मद शमी धावला मदतीसाठी; पाहा Video

Mohammed Shami

Mohammed Shami । नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप मध्ये भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याने जबरदस्त कामगिरी केली आहे. शमीने आपल्या गोलंदाजीने चांगल्या दिग्गज फलंदाजांना चकवले. मात्र व्यक्तिगत जीवनात मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा एक चांगला व्यक्ती आहे. तो इमोशनल आणि विनम्र आहे. शमीमधील हे गुण पुन्हा एकदा दिसून आले आहेत. वर्ल्डकप नंतर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी शमी हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झाला आहे. त्या ठिकाणी एका कारचा अपघात झाला यावेळी मोहम्मद शमी स्वतः त्या व्यक्तीच्या मदतीला धावला. यासंदर्भात मोहम्मद शमीने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. (Mohammed Shami Viral video)

China Pneumonia Outbreak । मोठी बातमी! मुलांच्या खोकल्याला हलके घेऊ नका, चीनच्या ‘गूढ न्यूमोनिया’वर दिल्लीच्या डॉक्टरांचा इशारा

हा व्हिडिओ शेअर करत शमिने लिहिले आहे की, “हा व्यक्ती खूप भाग्यशाली आहे. ईश्वराने त्याला दुसरे जीवन दिले आहे. या व्यक्तीची कार रस्त्यावरून दरीत कोसळली होती. त्या व्यक्तीची गाडी माझ्या थोड्या पुढे होती आम्ही सुरक्षित त्यांना बाहेर काढले आहे. असे शमिने त्याच्या इंस्टाग्राम वर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे.

Crime । भयानक! अवघ्या 350 रुपयांसाठी मध्यरात्री केली निर्घृण हत्या, मग मृतदेहासमोर आरोपीने केला डान्स; पाहा धक्कादायक VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जखमी झालेल्या व्यक्तीच्या हाताला मोहम्मद शमी पट्टी बांधताना दिसत आहे. यामध्ये मोहम्मद शमीने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून लाल रंगाची टोपी घातली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इतर अनेक जण उभे असल्याचे देखील दिसत आहे. शमीच्या या व्हिडिओवर हजारो जणांनी कमेंट केल्या आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी शमीच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

Viral News । भीक मागून ही पाकिस्तानी मुलगी बनली श्रीमंत, मलेशियात निर्माण केले स्वतःचे साम्राज्य

Spread the love