Gopichand Padalkar । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून धनगर समाजाचा प्रश्न योग्य पद्धतीने न हाताळणाऱ्या असंवेदनशील सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पडळकर यांनी फडणवीस यांना आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल धनगर लोकांवरील खटले मागे घेण्याची विनंती केली आहे.
Rain Update । ठाणे-पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वीज पडून इमारतीला आग
पडळकर यांनी धनगर समाजाचा (Dhangar society) एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली होती. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी त्यांनी मागण्यांची यादी आणि राज्य सरकारला 50 दिवसांची मुदत दिली होती. मात्र सरकारने या मागणीवर कार्यवाही न केल्याने राज्याच्या विविध भागात निदर्शने करण्यात आली.
Mohammed Shami । कार दरीत कोसळताच स्टार गोलंदाज मोहम्मद शमी धावला मदतीसाठी; पाहा Video
पडळकर यांनी पत्रात ही केली मागणी
जालना येथील धनगर आरक्षण याचिका प्रकरणी 36 धनगर बहुजन समाजातील सदस्यांवरील खटले रद्द करण्यात यावे व प्रकरण संवेदनशीलतेने न हाताळून पोषक वातावरण बिघडविणाऱ्या पोलीस महानिरीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.