मुंबई : आपण पाहतो सोशल मिडियावर प्रत्येक गोष्टीसाठी मीम्स (Memes) वापरले जातात. तसेच अलीकडे आता पोलिससुध्दा (delhi police)सायबर गुन्हे, रहदारीचे नियम आणि अनेक विषयांवर जागरुकता पसरवण्यासाठी मीम्सचा आधार घेतात. दरम्यान दिल्ली पोलिसांनी आशिया चषक (asia cup 2022) अंतिम सामन्यानंतर असाच मीम्सचा एक व्हिडिओ शेअर करत वाहतुकीच्या सुरक्षेच्या बाबतीत भाष्य केले आहे. पोलिसांनी साधासोप्पा नाही तर चक्क पाकिस्तान क्रिकेट (Pakistan cricket team) संघाचा व्हिडीओ वापरल्याने हे हटके मीम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे.
वाहतूक पोलिसांनी यापूर्वी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक मार्ग वापरले आहेत.ट्वीटमध्ये तुम्ही पाहू शकता की कालच्या सामन्यात आसिफ अली आणि शादाब खान यांनी एकमेकांना आदळून एक महत्त्वाची विकेट सोडली होती. घडल असं की, दोघेही क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करत होते आणि दोघांचेही चेंडूवर लक्ष होते. मात्र, ते एकमेकांना धडकल्याने कोणालाच झेल घेता आला नाही.उलट चेंडू थेट सीमा रेषेच्या पार गेला.यामुळे श्रीलंका टीमला सहा धावा मिळाल्या. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ पोस्ट केला.
या व्हिडिओला ‘ए भाई, जरा देख के चलो’हे गाणे लावून रस्त्यावर चालतानाही नेहमी लक्ष ठेवून चाला असा सल्ला दिला आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांचा हा हटके अंदाज नेटकऱ्यांना खुपच आवडला आहे. याआधी देखील दिल्ली पोलिस विभागाने टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कार अपघातानंतर, कार चालवताना किंवा बसताना सीटबेल्ट घालण्याच्या महत्त्वाबद्दल नागरिकांना शिक्षित करण्यासाठी ट्विटरवर एक मोहीम सुरू केली आहे याचा भाग म्हणून अशा पद्धतीचे ट्वीट केले जात आहेत.
Ajit Pawar: “मी वॉशरुमलाही जायचं नाही का?”, अजित पवार संतापले