Rahul Narvekar । राहुल नार्वेकर यांचा संजय राऊतांना इशारा; म्हणाले, “यामुळे सरकार पडत नाही…”

Rahul Narvekar

Rahul Narvekar । महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना इशारा दिला आहे. नार्वेकर म्हणाले, सरकारने सभागृहात बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. सरकार पडायचे असते तर ते सभागृहातील आकड्यांच्या जोरावर पडले असते, त्यामुळे सरकार पडेल, असे भाषण कोणी करू नये. सभागृहात अविश्वास ठरावानंतर संख्या कमी झाली तर सरकार पडते. बाहेर कोण बोलतंय म्हणून सरकार पडत नाही. सरकार असंवैधानिक पद्धतीने पडते, अशी भाषा कोणीही वापरू नये. असे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

Viral Video । चालत्या ट्रेनमध्ये पुरुषाने केले अश्‍लील कृत्य; महिलेने चप्पलने मारले अन्…

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत वेळप्रसंगी निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला कालबंध. त्यानुसार, वेळेत निर्णय देण्याचा माझा मानस आहे. विधानसभेच्या नियमांचे उल्लंघन होऊ दिले जाणार नाही. योग्यवेळी आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेतील, असे नार्वेकर म्हणाले.

Supriya Sule । दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी मोठ्या संकटात, सरसकट कर्जमाफी करा – सुप्रिया सुळे

आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा (Rahul Narvekar On Aditya Thackeray)

पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन होत आहे की नाही हे विधानसभा अध्यक्षांनी ठरवायचे आहे. आदित्य ठाकरेंना हा निर्णय घ्यायचा नाही. त्यामुळे पक्षांतरविरोधी कायद्याचे उल्लंघन झाले आहे, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी करू नये. या कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर एक सक्षम विधानसभा अध्यक्ष या नात्याने मी नक्कीच निर्णय घेईन. कोणताही चुकीचा निर्णय दिला जाणार नाही, अशी ग्वाही मी महाराष्ट्रातील जनतेला देतो. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत राहावे.

Viral Video । आधी रस्त्यावर फेकले, नंतर वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर

Spread the love