Accident News । कारला विमानाने दिली मागून जोरदार धडक, चालक आणि पायलट दोघेही जखमी; रुग्णालयात दाखल

Accident

Accident News । मंगळवारी (28 नोव्हेंबर 2023) अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात महामार्गावर विमानाचा अपघात झाला. विमानाने एका कारला पाठीमागून धडक दिल्याने चालक आणि पायलट दोघेही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रुकलिन पार्क, मिनेसोटा येथे सकाळी 10.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

Video । भीषण अपघात, खेळता खेळता 3 वर्षाच्या मुलीवर काचेचा दरवाजा पडला, धक्कादायक व्हिडीओ आला समोर

अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि म्हणाले, ‘कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमान अपघातानंतर पोलिसांनी पुढे सांगितले की, ‘हे विमान जवळच्या विमानतळाच्या दिशेने जात असताना अचानक त्याची शक्ती गेली, त्यामुळे त्यांनी रेडिओवर आणीबाणीची घोषणा केली आणि विमान एका प्रमुख महामार्गावर उतरवण्याचा निर्णय घेतला. पण त्या वेळी उतरत असताना एक कार आली आणि हा अपघात झाला.

Heavy Rain । अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर, नुकसान भरपाई कशी होणार?

अग्निशमन विभागाने पायलटचे केले कौतुक

संपूर्ण अपघाताची कहाणी सांगताना अग्निशमन विभागाने पायलटचे कौतुक केले. ते म्हणाले की, विमानावरील तुमचे पूर्ण नियंत्रण सुटलेले असताना आणि तुम्ही वेगाने खाली लँडिंग करत असताना अशा स्थितीत विमान महामार्गावर उतरवणे हे एक मोठे आव्हान आहे. पण पायलटने आपल्या बुद्धीने विमान उतरवले आणि एकच गाडी बाधित झाली.

हिरडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी दिपाली दरेकर यांची बिनविरोध निवड

Spread the love