Uttarakhand tunnel rescued । उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यातून सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना चिन्यासीसुंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व कामगार डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना ४८ तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर हे सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या बचाव कार्यात गुंतलेल्या सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत. यासोबतच या मोहिमेत सहभागी असलेल्या आंतरराष्ट्रीय टनेलिंग तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स आणि ख्रिस कूपर यांचे देखील आभार मानले आहे. (Uttarakhand tunnel rescued)
Accident News । कारला विमानाने दिली मागून जोरदार धडक, चालक आणि पायलट दोघेही जखमी; रुग्णालयात दाखल
सर्वांना एक लाख रुपये मिळणार
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सर्व ४१ मजूर बरे झाल्यानंतर त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासोबतच रुग्णालयातील उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. सरकार सर्व राज्यांमध्ये घरपोच पोहोचण्याची संपूर्ण व्यवस्था करेल. त्यासाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Video । भीषण अपघात, खेळता खेळता 3 वर्षाच्या मुलीवर काचेचा दरवाजा पडला, धक्कादायक व्हिडीओ आला समोर
बाबा बोखनागचे भव्य मंदिर बांधले जाईल
बचाव कार्य यशस्वी होताच मुख्यमंत्री धामी यांनी सिल्क्यरा येथे बाबा बौखनागचे भव्य मंदिर बांधण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, बाबा बोखनाग यांच्या आशीर्वादाने सर्व कामगार सुखरूप बाहेर आले आहेत. बाबा बोखनागचे मंदिर बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यादृष्टीने आवश्यक निर्देश जारी करण्यात आले आहेत.
Heavy Rain । अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर, नुकसान भरपाई कशी होणार?