नागपूर : आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार (farmers) नवनवीन योजना राबवत असतात. दरम्यान या योजनांमधून (scheme) शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक चांगला लाभ मिळतो. महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. शेती (agriculture) उत्पादन आणि बाजारपेठ (market) याबाबत नागपूरमध्ये (Nagpur) आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित होते.
या कार्यक्रमात गडकरी यांनी शेतकऱ्यांना सरकारच्या भरवश्यावर राहू नका. तुम्ही सरकारकडून शेतीमालाला हमीभाव मिळून मग मालाचे दर वाढतील यावर अवलंबून राहू नका. तर या उत्पादन वाढीबरोबर बाजारपेठ शोधण्यावरही भर द्या असा मोलाचा सल्ला दिला आहे. सध्या सेंद्रिय शेतीमालाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि मुळात शेतकरीच आता उत्पादन (production) वाढीवर भर देत आहे, पण मार्केटचे काय? त्यामुळे मार्केटही येथेच आहे त्याचा शोध घेणे गरजेचे आहे अस देखील गडकरी म्हणाले.
पुढे गडकरी म्हणाले की, शेतकर्यांनी सेंद्रीय शेती ही अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण शेतीमाल हा जर रासायनिक पद्धतीने पिकवलेला तर आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या मालाची चवही वेगळीच असते.म्हणून आत्ताच्या काळात सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या मालाला जास्त मागणी आहे. तसेच उत्पादनवाढीच्या नादात शेतीमालाच्या दर्जाकडे देखील दुर्लक्ष होत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
Ajit Pawar: “मी वॉशरुमलाही जायचं नाही का?”, अजित पवार संतापले