Ajit Pawar । बिग ब्रेकिंग! अखेर मराठा समाजाच्या विरोधानंतर अजित पवार यांचा दौरा रद्द, नेमकं कारण काय?

Ajit Pawar

Ajit Pawar । मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा थेट फटका आता राजकीय नेत्यांना बसत आहे. मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामध्ये वाद सुरू आहेत, अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मराठा बांधवांचा विरोध होत आहे. (Latest Marathi News)

Accident News । भीषण अपघात! भरधाव ट्रकची स्कुटरला जोरदार धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

मराठा समाजाने अजित पवारांच्या संभाजीनगर दौऱ्याला विरोध केला होता. आज अजित पवार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता होणार होते. परंतु, त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द झाला आहे, असे सांगण्यात आले आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)

Viral । ट्रेनमध्ये एका वृद्ध महिलेच्या हातातून ज्यूसचा ग्लास पडला, “नंतर व्यक्तीने केले असे कृत्य की…”, पाहा Video

अजित पवारांनी संमेलनाला येऊ नये म्हणून सकल मराठा समाजाकडून आवाहन करण्यात आले होते. अजित पवार यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. याबाबत त्यांनी एक पत्र देखील तहसीलदारांना दिले होतं. अशातच आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Datta Dalvi । “गाडी फोडताना मी तिथे असतो तर दोघांना तरी….” तुरुंगातून बाहेर येताच दत्ता दळवी यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Spread the love