Maharashtra Politics । बीड : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election 2024) पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष तयारीला लागले आहे. पक्षबांधणीचे काम सुरु असताना उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Balasaheb Thackeray Group) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. चार तालुक्यातील शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. याचा परिणाम साहजिकच आगामी निवडणुकीवर दिसून येईल. (Latest Marathi News)
बीडच्या परळी येथे ठाकरे गटाच्या चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामे दिले आहेत. जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करत नवीन तीन जिल्हाप्रमुखांची निवड केली. याच कारणावरून नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे समोर आले आहे. (Shivsena party workers resign)
दरम्यान, उपजिल्हाप्रमुख अभय कुमार ठक्कर, परळी व्यंकटेश शिंदे, अंबाजोगाई तालुका प्रमुख राजाभाऊ लोमटे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत. जिल्ह्यात ठाकरे सेना नाही तर अंधारे सेना करण्याचे काम सुषमा अंधारे यांच्या द्वारे केला जात आहे, असा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. अंधारे यांच्या एकाधिकारशाहीला आपण कंटाळलो असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.