Ranbir Kapoor । रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड अॅक्शन-क्राइम चित्रपट ‘अॅनिमल’ (Animal Movie Box Office Collection) 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील रणबीर कपूरच्या लूकचे लोकांना वेड लागले आहे. त्याची बॉडी पाहून चाहते वेडे झाले आहेत. पण रणबीर कपूरला ‘अॅनिमल’साठी अशी बॉडी बनवण्यासाठी खूप घाम गाळावा लागला होता, हे तुम्हाला माहीत आहे का? (Entertainment News )
रणबीरचे फिटनेस त्यांनी कोच शिवोहम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर रणबीर कपूरच्या मेहनतीची आणि धैर्याची झलक दाखवली आहे. रणबीर कपूरच्या वर्कआउटचे अनेक व्हिडिओ एकामागून एक शेअर केले आहेत. या व्हिडिओंसोबत शिवोहमने रणबीर कपूरच्या शेड्युलबद्दलही लिहिले आहे. (Ranbir Kapoor Video)
रणबीर कपूरने 11 किलोने वाढवले वजन!
शिवोहमने सर्वप्रथम रणबीर कपूरच्या दोन फोटोंचा कोलाज शेअर केला होता ज्यामध्ये रणबीरचा ‘तू झुती मैं मक्कर’मधील फिट लूक दिसत होता. अभिनेत्याच्या फिटनेस कोचनुसार, त्यावेळी रणबीरचे वजन ७१ किलो होते. दुसरे चित्र रणबीरचे त्याच्या परिवर्तनानंतरचे आहे जिथे अभिनेत्याने त्याचे वजन 11 किलोने वाढवले आणि 82 किलो झाले.
Rohit Pawar । राष्ट्रवादी संघर्षावर रोहित पवारांचं मोठे विधान; म्हणाले…