Pune Fire News । पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे भागात मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला काल लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच चिखली, देहूरोड पोलिसांसह अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यनानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू होते. यानंतर आग थोडी आटोक्यात आणण्यात आली मात्र आगीत मेणबत्ती कंपनी जळून खाक झाली आहे. आणि सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवडचे एसीपी (गुन्हे) पद्माकर घनवट म्हणाले, “मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण जखमी झाले आहेत. ही घटना काल दुपारी तीनच्या सुमारास घडली. घटनेमागील कारणे शोधली जात आहेत.” (Pimpri Chinchwad Fire News)
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील मेणबत्ती निर्मिती युनिटला शुक्रवारी लागलेल्या आगीत किमान सहा जण ठार तर आठ जण जखमी झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त सिंग म्हणाले, या आग लागल्याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र यामध्ये जखमी झालेल्या लोकांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Ajit Pawar । एकनाथ शिंदे नाराज? फडणवीस यांच्या लेटर बॉम्बनंतर महायुतीत अजित पवार एकटे