
Train Accident । महाराष्ट्रातील कसारा येथे रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला आहे. येथील इगतपुरी रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरली आहे. रेल्वेच्या एकूण ७ बोगी रुळावरून घसरल्या आहेत. त्यामुळे कसारा ते इगतपुरी या डाऊन सेक्शनमधील मेल एक्स्प्रेस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, उपनगरीय लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
Sanjay Raut । सर्वात मोठी बातमी! सोलापूरमध्ये संजय राऊत यांच्या कारवर चप्पल फेक
मालगाडी घसरल्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. मुंबईकडून नाशिकमार्गे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले तर काही गाड्या रद्द केल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकूण 20 गाड्यांचे मार्ग बदलले तर पाच गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
महाराष्ट्रातील कसारा येथे डाउन मेन लाईनवर कसारा ते TGR-3 डाउन लाईन सेक्शन दरम्यान सुमारे 18.31 तासांच्या सुमारास मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे कसारा ते इगतपुरी या डाऊन सेक्शनमधील मेल एक्स्प्रेसची वाहतूक प्रभावित झाली. मिळालेल्या माहितीनुसार, उपनगरीय लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. इगतपुरी ते कसारा यूपी विभागातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, तो चालू आहे.
Bageshwar Baba Threat Case । बागेश्वरबाबा धमकीप्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती
या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले
17612 Csmt नांदेड एक्सप्रेस
12105 Csmt गोंदिया एक्सप्रेस
१२१३७ सीएसएमटी-फिरोजपूर पंजाब मेल
12289 Csmt नागपूर दुरंतो एक्सप्रेस