मांडवगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टराचे निलंबन करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

Mandavagan

मांडवगण (Mandavagan) प्राथमिक आरोग्य केंद्र(PHC) येथील डॉक्टर श्री.श्रीनिवास सारूक यांचे आरोग्य केंद्रात येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांशी वागणुक आणि वर्तणूक चांगली नाही याच्या तक्रारी वेळोवेळी गावातील लोकांकडून आणि आरोग्य केंद्रात येणाऱ्या आसपासच्या लोकांकडून आल्या होत्या.हे डॉक्टर (Mandavagan Primary Health Center Doctor) लोकांना नीट चेक करत नाही.इंजेक्शन औषधे देत नाही.सलाईन सुद्धा देत नाही. यांचे म्हणणे आहे की आपण लोकांना सलाईन इंजेक्शन दिले की लोक कायमच आपल्याकडे येतील त्यांना आपण सुविधा द्ययाच्या नाही.हा डॉक्टर एवढा विकृत असून गोर गरीब लोकांना सरळ सरळ धमक्या देत आहे माझ्यावर मोठ्या मंत्र्यांचा आणि जिल्हा हेल्थ ऑफिस चा हात आहे अश्या प्रकारच्या धमक्या देऊन तुम्हाला काय करायचे कुणाकडे माझी तक्रार करायची असे आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना सांगत असतात. (Latest Marathi News)

Gutami Patil । आरक्षणाच्या वादात गौतमीची उडी, केलं मोठं वक्तव्य

या मनुष्य डॉक्टरकी पेशाला काळिमा फासणारा विकृत मनुष्य आहे.डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात आपूलकीचे नाते असते रुग्ण डॉक्टरला देवा समान मनात असताना हे विकृत मनुष्य त्यांच्या सोबत गैरवर्तन करतो.याधी याला तहसीलदार श्री.ढोकले साहेब आणि तालुका आरोग्य अधिकरी सौ.डांगे मॅडम यांच्याकडून वर्तवणूक सुधारण्यासाठी वेळ आणि ताकीत देण्यात आली होती.महिना होऊन सुद्धा याच्या वागणुकीत कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही याने पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे.

Chhagan Bhujbal । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांना मोठा दिलासा

संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डांगे मॅडम आणि तालुका गटविकास अधिकरी राणी खराडे मॅडम याना निवेदन देण्यात आले.यावर दोन दिवसात चौकशी करण्यात येईल आणि संबंधित डॉक्टर वर कारवाई करण्याचे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका गटविकास अधिकारी यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष(शेतकरी आघाडी) संग्राम देशमुख यांना दिले आहे.यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे,तालुकाध्यक्ष नानाजी शिंदे,विजय वाघमारे,योगेश देशमुख,माऊली कण्हेरकर,बाप्पू गांगरडे,अमोल घोडके उपस्थित होते.

Political News । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Spread the love