Libya । जगात दररोज कित्येक अपघात (Accident News) होतात, यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तर काहींना कायमचे अपंगत्व येते. अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. चांगले रस्ते आणि वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक करूनही अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. सध्या अशीच एक भीषण दुर्घटना घडली आहे. स्थलांतरितांना नेणारं जहाज बुडालं असून त्यात 61 जणांचा मृत्यू झाला आहे. (Migrant Tragedy)
Covid19 Sub Variant । कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगाचं वाढलं टेन्शन! दोघांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना लीबियामध्ये (Libya Migrant Boat Sank) घडली आहे. दरम्यान, 2011 साली लीबियामध्ये नाटो समर्थित विद्रोह झाल्यापासून प्रचंड अस्थिरता पसरली आहे. कित्येकजण हा देश सोडून युरोपात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या लोकांची तस्करी करण्यासाठी सैन्यांचे काही गट कार्यरत असून लीबियाचा काही किनारी भाग या गटाकडून नियंत्रित आहे. (Latest Marathi News)
Kamalnath । मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना मोठा फटका! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन डच्चू
एक जहाज 86 स्थलांतरितांना घेऊन लीबियाच्या जवारा शहरातून चालले होते. (Libya Migrant Tragedy) समुद्रमार्गे युरोपात जाण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडली आहे. 86 स्थलांतरितांपैकी 61 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. यात महिला-मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.