Nagpur Blast । नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ९ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही कंपनी दारुगोळा सप्लाय करते. कंपनीत (Solar Explosive Company in Bazargaon) सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दारूगोळा बनवण्याचे काम चालू असताना घटना घडली आहे. (Latest Marathi News)
Pune Crime । धक्कादायक! शारीरिक संबंधास नकार दिल्याने डोक्यात घातला रॉड, महिलेचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीत (Solar Explosive Company) स्फोट झाला आहे. नऊच्या दरम्यान झालेल्या स्फोटामध्ये दुर्घटना झाली आहे. या कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू होते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही कंपन्यांना ही कंपनी दारूगोळा सप्लाय करते. एक्सप्लोसिव्हमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होतो.
Maharashtra | There has been a blast in the Solar Explosive Company in Bazargaon village of Nagpur, this blast happened at the time of packing in the cast booster plant in the Solar Explosive Company. More details awaited: Nagpur Rural Police
— ANI (@ANI) December 17, 2023
नागपूरमधील बाजारगाव येथे ही कंपनी आहे. कंपनीत दारुगोळा बनवण्याचे काम सुरु असताना स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये ९ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. याबाबत नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास नागपूर पोलीस करत आहेत.
Libya । भीषण दुर्घटना! स्थलांतरितांना नेणारं जहाज बुडालं, 61 जणांचा मृत्यू