
Man Dies During Marriage । सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ आपल्याला हसायला भाग पाडतात तर काही व्हिडिओ पाहून आपल्याला धक्का बसतो. सध्या देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडिओमध्ये बसल्या बसल्या एका नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आल्याचे नवरदेवाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
हा व्हिडिओ पाकिस्तान मधील असल्याचे बोलले जात आहे. जिओ न्यूज ने दिलेल्या माहितीनुसार, सियालकोटमधील दस्का तालुक्यात ही घटना घडली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नववधू आणि वर एका सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूला नातेवाईक आणि लहान मुले देखील आहेत. यावेळी सर्व जण हसत एकमेकांशी चर्चा करत आहे. मात्र अचानक त्या आनंदावर विरजण पडल्याचे पाहायला मिळत आहे.
Accident News । कारचा भीषण अपघात! मुलीच्या डोळ्यादेखत आई आणि भावाचा गेला जीव
सोफ्यावर बसलेला नवरदेव अचानक खाली पडतो. या तरुणाचा श्वास अडकतो, यावेळी सगळीकडे गोंधळ उडतो उपस्थित लोकांना काही समजत नाही. मात्र त्या नवरदेवाला उचलतात मात्र श्वास बंद झाल्याचं लक्षात आल्यानंतर सर्वजण वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागतात. पण त्यांना अपयश येते. यानंतर नवऱ्या मुलाचा मृत्यू होतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवऱ्या मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.
Groom dies on wedding due to sudden heart attack in Daska Sialkot
— Shahid Iqbal (@MeAamAdmi) December 18, 2023
All there shocked#HeavyRain #DawoodIbrahim #Earthquake #SherAfzalMarwat #Islamabad #طوفان_الأقصى #snowfall pic.twitter.com/YlnLnIJo4W