भारतीय स्टेट बँकमध्ये लिपिक पदासाठी एकूण 5008 पदांची भरती होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भात एसबीआयने जाहिरात प्रसिद्ध केलीये. त्यामुळे बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या जागांसाठी पदवीधर विद्यार्थी अर्ज करु शकतात, त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 20 ते 28 यामध्ये असावे, अशी अट देखील ठेवण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता –
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे ग्रॅज्युशन पूर्ण झालेले असावे. किंवा अर्जदाराने अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले असेल तर त्यासोबत अर्जदाराने आपल्या अर्जासोबत अंतिम परीक्षा दिल्याचा पुरावा जोडावा.
वयोमर्यादा –
अर्ज करणारा व्यक्ती हा कमीत कमी 20 ते 28 वयोगटामधील असावा.
अर्ज करण्याची तारीख –
दिनांक 07/09/2022 ते 27/09/2022
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेत स्थळावर भेट द्या
https:/bank.sbi/careers
https:/www.sbi.co.in/careers