Rovman Powell Networth । क्रिकेटच्या सर्वात मोठ्या लीग म्हणजेच IPL च्या 17 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. कोका-कोला एरिना येथे सुरु असलेल्या लिलावात ३३२ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. यामध्ये लिलाव सोहळ्यात सर्वात आधी बोली वेस्ट इंडिजच्या ३० वर्षीय खेळाडू रॉवमन पॉवेलवर लागली. आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वीच या खेळाडूवर मोठ्या बोली लागल्या आहेत.
लिलावाचा पहिला खेळाडू श्रीमंत झाला
आयपीएल 2024 च्या लिलावात वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू रॉवमन पॉवेलचे नाव प्रथम घेतले गेले. रॉवमन पॉवेल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मोठी स्पर्धा होती. पण शेवटी राजस्थान रॉयल्सने बाजी मारली आणि रॉवमन पॉवेलला 7.40 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात समाविष्ट केले.
पॉवेलची क्रिकेटमधून वार्षिक कमाई किती?
पॉवेलबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पॉवेलची वार्षिक कमाई २ कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. या व्यतिरिक्त पॉवेल हा सीपीएल आणि आयीपएलशी करार करून चांगली कमाई करतो. २०२२ मध्ये झालेल्या लिलावात पॉवेलवर दिल्ली कॅपिटल्सने २.८ कोटींची बोली लावली होती .
Congress । काँग्रेसला मोठा धक्का! या आमदाराने दिला तडकाफडकी राजीनामा
राजस्थान रॉयल्सचा सध्याचा संघ:
रॉवमन पॉवेल, अॅडम झाम्पा, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौर, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, आर. अश्विन, रायन पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल.
Sharad Pawar | 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवारांनी दिली संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…