Pune News । पुणे हादरलं! भाजप युवा नेत्याची रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या, नेमकं कारण काय?

Pune BJP Leader Sunil Dhumal Suicide

Pune News । पुणे : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. सर्व पक्ष याच पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करत आहेत. अशातच आता पुणे (Pune) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भाजप (BJP) युवा नेत्याने टोकाचा निर्णय घेतला आहे. हडपसर परिसरात असणाऱ्या साडेसतरा नळीमध्ये ते राहत होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Israel Hamas War Update । जीवन नरक बनले! इस्रायलच्या हल्ल्यात १७ दिवसांच्या मुलीचा गेला जीव

भारतीय जनता पार्टीचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील मधुकर धुमाळ (Sunil Madhukar Dhumal) यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचं (Sunil Dhumal Suicide) कारण अजूनही समजू शकले नाही. आत्महत्या केलेल्या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. ही धक्कादायक घटना काल मंगळवारी सकाळी उघडकीस घडली आहे. (BJP Leader Sunil Dhumal News)

Pune Korean Blogger News । मोठी बातमी! लाइव्ह व्हिडिओमध्ये कोरियन ब्लॉगरचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, सुनील धुमाळ यांची एक अॅक्टिव्ह नेता अशी ओळख होती. त्यांच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस आणि रेल्वे मार्ग पोलीस करत आहेत.

Accident News । धक्कादायक! दारूच्या नशेत होत्याच नव्हतं झालं, रिक्षा आणि दुचाकीच्या धडकेत तीन जण ठार

Spread the love