Accident News । दुर्दैवी! ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने चिमुकल्याला चिरडलं

Accident News

Accident News । जळगाव : जिल्ह्यात ऊसतोड सुरु आहे. ट्रॅक्टर किंवा ट्रकच्या साहाय्याने साखर कारखान्यात (Sugar Factories) उसाची वाहतूक केली जात आहे. परंतु, अनेकदा ही वाहतूक (Transportation of Sugarcane) धोक्याची ठरते. कारण उसाची वाहतूक करत असताना अनेक अपघात (Accident) घडल्याचे आपण पाहतो. या अपघातात काहींना आपले जीव गमवावे देखील लागतात. सध्या असाच एक भीषण अपघात घडला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । अखेर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यावल तालुक्यात ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने 12 वर्षीय मुलाला चिरडल (Jalgaon Accident News) आहे. आनंद रघुनाथ सोनवणे (वय 12 वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि चालकाला अटक केली आहे.

Parliament MP Suspended । खासदार निलंबनाचा सपाटा सुरूच! आणखी दोन खासदार निलंबित

12 वर्षीय मुलाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक चांगलेच संतापले आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करा,अशी मागणी केली जात आहे. या दुर्दैवी घटनेनंतर निमगाव गावावर शोककळा पसरली आहे. तसेच मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Maharashtra Politics । बारामतीचा आगामी खासदार भाजपचाच होणार, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

Spread the love