Elephant Attack । वन्यप्राणी सतत हल्ले (Wildlife attacks) करत असतात. यात काहींना आपले जीव गमवावे लागतात. तर काही प्राणी जागीच ठार होतात. याच पार्श्वभूमीवर प्रशासन उपाययोजना करत असते. सध्या असेच काहीसे प्रकरण घडले आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या कारवर हत्तीनं थेट हल्ला (Elephant Attack in Car) केला. पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना श्रीलंकेमध्ये (Elephant Attack in Shrilanka) आहे. एक कार रस्त्यानं जात असताना एका हत्तीने (Animal Attack) जंगलातून धावत येत त्यांनी कारचा रस्ता अडवला.कार चालकाने हत्तीला दुखापत होऊ नये म्हणून कार थांबवली. परंतु, चवताळलेल्या हत्तीनं खिडकीमधून आत शिरण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेमुळे कार चालकांसह आतील व्यक्ती खूप घाबरल्या होत्या.
पहा व्हिडिओ
हत्तीने अचानक केलेल्या हल्ल्यात कारचे खूप नुकसान केले. संधी मिळताच क्षणी कारचालकाने कार पळवून नेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. जर कारचालकाने कार तिथून नेली नसती तर गंभीर दुखापत झाली असती. या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आली आहे. व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.