
Poonch Terrorist Attack । गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. अधिकार्यांनी सांगितले की, दोन शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. (Poonch Terrorist Attack)
लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची पाकिस्तानस्थित शाखा पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मूमधील संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या भक्कम गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रात्री पूंछ जिल्ह्यातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सैनिक घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी दोन वाहनांवर (एक ट्रक आणि एक जिप्सी) गोळीबार केला.
Corona Update । सावधान! कोरोना झाला जीवघेणा, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू
पाच जवान शहीद, दोन जखमी
या हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. या कारवाईत पाच जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहीम सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी, भीषण चकमकीत सैनिक आणि दहशतवादी यांच्यात आमने-सामने संघर्ष होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी नाकारली नाही.