New Year Gift । मद्यप्रेमींसाठी खुशखबर! नाताळ-नववर्षाच्या रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार वाईन शॉप

liquor-shop-pubs-bars-wine-shops-open-till-till-5am-on-december-24-25-and-31st

New Year Gift । दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या (New Year) स्वागतासाठी सर्वत्र हॉटेल्स, क्लब, पब अगदी शेतसुध्दा तरुणाईच्या रंगांनी उजळून निघते. आपल्याला ठिकठिकाणी रोषणाई, फटाके आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारलेला अनुभवायला मिळत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्साह आपल्याला पाहायला मिळेल. (Latest Marathi News)

Manglashtaka in Marriage । हिंदू विवाहात किती मंगलाष्टक असाव्यात? तुम्हाला माहिती आहे का?

अशातच आता मद्यप्रेमींसाठी (Alcohol lovers) एक खुशखबर आहे. नाताळ (Christmas) आणि नववर्षानिमित्त राज्य सरकारकडून मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरला मद्य किरकोळ विक्रीची दुकानं (Liquor shop) रात्री 10.30 ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. याबाबत एक्साईज विभागाने (Excise Department) एक परिपत्रक देखील जारी केलं आहे.

Baramati Loksabha । बारामती लोकसभेसाठी भाजपचा नवा डाव, ‘या’ बड्या नेत्यावर सोपवली जबाबदारी

तसेच महानगरपालिका, अ, व आणि ब वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत बार आणि वाईन शॉप सुरु राहणार आहे. त्यामुळे शासनाने तीन दिवस ही परवानगी दिल्याने मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Czech Republic Firing । धक्कादायक! विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार, १५ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी

Spread the love