Shiv Sena Clash । महाड : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यापासून पक्षात शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आणि ठाकरे गट (Shiv Sena UBT) असे दोन गट पडले आहेत. तेव्हापासून दोन्ही गटात तणावाचे वातावरण असते. विविध मागण्यांवरून दोन्ही गट सतत आमनेसामने येत असतात. अशातच आता ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा सामनेसामने आला आहे. यामागचं कारण आहे ते म्हणजे शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य. (Latest Marathi News)
शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांच्याविरोधात ठाकरे गटाने मोर्चा काढला. परंतु, हा मोर्चा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. याच मुद्द्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात बाचाबाची झाली. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी हस्तक्षेप केला. यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली नाही. परंतु, या घटनेनंतर आता महाडमध्ये (Mahad) राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
‘बाळासाहेब ठाकरे आता वर गेले आहेत. त्यांचे मत जाणून घ्यायचे असल्यास तर कोणाला तरी वर जावं लागेल’, असे वक्तव्य भरत गोगावले यांनी केले होते. या वक्तव्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याच वक्तव्यावरून हा राडा झाला आहे. महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले आहेत. सुमारे दीड तास हा राडा सुरु होता. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.