PCMC fire । मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये आग लागल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सध्या देखील पिंपरी-चिंचवड मधून आग लागल्याची एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर परिसरात एका वसाहतीमध्ये मध्यरात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग एवढी भीषण होती की, या आगीमध्ये 2 घरे आणि जवळपास 20 दुचाकी वाहने पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. (PCMC fire)
Corona Update । धक्कादायक! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आवाज जाण्याचा धोका
या आगीची माहिती मिळतात अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात आली. ज्या बिल्डिंगमध्ये आग लागली त्या बिल्डिंगचे निर्माण पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे. मात्र या रहिवासी बिल्डींगमध्ये फायर फायटिंग सिस्टम नसल्याने आगीने अवघ्या काही क्षणात रौद्ररूप धारण केल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. (Pune Fire News)
या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये अज्ञातांनी दुचाकी वाहनांना आग लावली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आता या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.