
Dhananjay Munde Corona postive । देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांची मोठी चिंता वाढली आहे. पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. याच दरम्यान आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर अधिवेशनानंतर चाचणी केल्यानंतर कोरोना झाल्याचे आढळले आहे.
Tanaji Sawant Car Accident । सर्वात मोठी बातमी! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नागपूर अधिवेशन झाल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. सध्या मुंडे हे त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी कॉरंटाइन आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. (Dhananjay Munde Corona postive)
Train Accident । धक्कादायक! डब्यात चढताना महिला लेकरांसह रुळांवर पडली
मागच्या दोन दिवसापासून धनंजय मुंडे यांना खोकला आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी कोरोनाची चाचणी केली. यामध्ये त्यांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जगभरातील काही देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल आहे. भारतातही गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली