Mumbai News । धक्कादायक! ड्युटीवरून घरी जाताना पोलीस कॉन्स्टेबलचा मांजाने गळा चिरून मृत्यू

Mumbai News । मांजाने गळा चिरून मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा ड्युटीवरून घरी जाताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. समीर जाधव असं मृत्यू झालेल्या अमलदाराचे नाव असल्याचे देखील माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर जाधव हे दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी ते नियमित प्रमाणे आपल्या घरी चालले होते. यावेळी बाईकवरून जात असताना मांजाने गळा चिरून ते गंभीर जखमी झाले होते.

Ajit Pawar। तुम्ही वयाच्या ३८ व्या वर्षी काँग्रेस फोडली… अजित पवार यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलीस दलावर देखील मोठी शोककळा पसरली आहे. (Mumbai Latest News)

Corona Cases Thane । धक्कादायक! ठाण्याही कोरोना JN.1च्या नवीन प्रकाराचे पाच रुग्ण आढळले

मांजामुळे अनेकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण हे वाढले आहे. मांजाला धार आणण्यासाठी काच आणि लोखंडाच्या किसाचा वापर केला जातो त्यामुळे अनेकदा लोकांच्या जीवावर हे बेतत. मांजा बनवण्यासाठी काच आणि लोखंडाच्या किसचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आता मुंबई पोलिसांनी काढले आहेत.

Jio Offer । ३१ डिसेंबरपर्यंत जिओ रिचार्जवर उत्तम ऑफर, तुम्हाला १००० रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो; जाणून घ्या

Spread the love