
Bjp । भाजपला शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या भाजपच्या दोन आमदारांमधील वाद हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) आणि दुसरे आमदार विजयकुमार देशमुख (Vijay Kumar Deshmukh) यांच्यात वाक् युद्ध रंगल्याचे सध्या सोलापूरमध्ये पाहायला मिळतंय. सोलापूर हे खेडे आहे या वक्तव्यावरून भाजपच्या या दोन आमदारामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. या प्रकारची सोलापूरच नाहीतर संपूर्ण राज्यभर चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Solapur News)
Mumbai News । धक्कादायक! ड्युटीवरून घरी जाताना पोलीस कॉन्स्टेबलचा मांजाने गळा चिरून मृत्यू
नेमकं काय आहे प्रकरण?
सोलापूर हे मोठे खेडं आहे. त्याचा आणखी विकास करून कसे मोठे करता येईल. त्याचा विचार केला गेला पाहिजे, असे विधान आमदार सुभाष देशमुख यांनी केले. मात्र यातील सुभाष देशमुख यांच्या ‘खेडं’ या शब्दाला भाजपचे दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. विजयकुमार म्हणाले की, सुभाष बापू खेडे का म्हणाले मला कळले नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Ajit Pawar। तुम्ही वयाच्या ३८ व्या वर्षी काँग्रेस फोडली… अजित पवार यांचा शरद पवारांवर हल्लाबोल
त्याचबरोबर, सोलापूर दक्षिणेसाठी प्रवेशद्वार म्हटले जाते. देशाच्या प्रत्येक भागाला सोलापूर जोडले गेले आहे. सोलापुरात जमीन स्वस्त आणि मुबलक मॅन पॉवर आहे. असे देखील ते म्हणाले आहेत सोलापूर हे मोठे खेडं असं सुभाष देशमुख म्हणाले आहेत त्यामुळे आता सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात शाब्दिक वाद होताना पाहायला मिळत आहे.
Corona Cases Thane । धक्कादायक! ठाण्याही कोरोना JN.1च्या नवीन प्रकाराचे पाच रुग्ण आढळले