Ajit Pawar । शिरूर लोकसभा मतदार संघाचे (Shirur Lok Sabha Constituency) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओपन चॅलेंज दिल आहे. अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार अजित पवार यांनी केल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा हाय व्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
पहा काय म्हणाले अजित पवार?
एका खासदाराने पाच वर्षांमध्ये त्याच्या मतदारसंघात व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. मतदारसंघ त्यांनी दुर्लक्षित केल होत. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः माझ्या जीवाचं रान केलं होतं… असे अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी एक टोला देखील लगावला आहे. ते म्हणाले, “मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पदयात्रा सुचत आहे तर कोणाला संघर्ष यात्रा काढायचे आहे. असा टोला देखील अजित पवार यांनी लगावला आहे.
शिरूर मध्ये आम्ही आमचा उमेदवार उभा करणार असून त्या ठिकाणी उमेदवार निवडून आणणारच.. तुम्ही काळजीच करू नका असे थेट आव्हान अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याच्या चांगल्या चर्चा रंगल्या आहेत.
Gautami Patil । काय सांगता? गौतमी बनली पोलिस ऑफिसर? व्हिडीओ एकदा पहाच