मुंबई : वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेला त्यावरून राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केलीयं. आता हे प्रकरण थांबण्याचं नाव घेत नाही तोपर्यंत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप केलाय या आरोपाने आता खळबळ उडाली आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये रायगडयेथे रोहा-मुरुड भागात बल्क ड्रग पार्क प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले.
Ajit Pawar: अजित पवारांना मुख्यमंत्री करा, ‘या’ खासदाराने केली मागणी
रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ८० हजार जणांना रोजगार मिळणार होता. पण आता हा देखील प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या हालचाली चालू आहेत. नवीन सरकारचे कामामध्ये लक्ष नसल्याने हे घडतयं. अजून तरुण शांत आहेत. पण त्यांचा अंत नका पाहू नका, असा इशारा देखील आदित्य ठाकरेंनी दिलाय.
Supriya Sule: मुख्यमंत्र्यांनी घरगुती दौरे बंद करून राज्याच्या विकासाचं पहावं – सुप्रिया सुळे
रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेण्याचे घाटत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवदर्शन करत फिरतायेत. सरकारमधील मंत्र्यांना या प्रकल्पाबाबत विचारले असता कोणी काहीही उत्तर दिले नाही. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देखील हा विषय माहिती नाही. किमान उद्योगमंत्र्यांनी तरी उत्तरे दिली पाहिजेत. केंद्र सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेला, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय.
wheat: गव्हाची पेरणी करताय? तर मग या आहेत गव्हाच्या टॉप जाती; उत्पन्न निघेल भरघोस