Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली. त्यात 44 आमदार सामील झाले आणि अजितदादा गटाची सत्ता आली. त्यामुळे भविष्यात अजितदादा गटात मोठी इनकमिंग होईल असा अंदाज होता. पण हे गृहीतक चुकीचे असल्याचे दिसते. अजितदादांची सत्ता असतानाही नेते आणि कार्यकर्ते आता त्यांच्याकडे येण्याऐवजी त्यांना एकटे सोडत आहेत. नवीन वर्षात अजितदादांचे कट्टर समर्थक अजितदादा गटाचा निरोप घेणार आहेत. अजितदादांचे हे समर्थक ठाकरे गोटात जाणार असून त्यांनी काल उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आहे.
CGS Vikram । भारतात येणाऱ्या जहाजावर ड्रोन हल्ला कोणी केला? समोर आली धक्कादायक माहिती
नव्या वर्षात ठाकरे गटापेक्षा अजित पवार गटाला मोठा फटका बसणार आहे. अजितदादांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे गटात सामील होणार आहेत. ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेऊन संजोग वाघेरे यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही संजोग यांचे स्वागत केले आहे. त्यामुळे अजितदादांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Viral Video । नवरदेवाने वरमाला घालताच नवरीने भरमंडपात थेट त्याच्याच कानाखाली वाजवली; पहा व्हिडिओ
संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडमधील मोठे नाव आहे. वाघेरे यांनी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. शिवाय, ते अजितदादांच्या जवळचे आणि एकनिष्ठ म्हणून ओळखले जातत. आज वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना मावळ लोकसभा मतदारसंघात इच्छुक असल्याचे सांगितले. त्यावर दोन-चार दिवसांत विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
ChatGPT नंतर आता AppleGPT! ऍपलने स्वतःचे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार केले?