Abhishek Bachchan । अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. 2000 मध्ये रिलीज झालेल्या ‘रिफ्यूजी’ या चित्रपटांमधून अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. असे अनेक बॉलीवूड अभिनेते आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांची परिस्थिती खूप हालाखीची होती. त्यांना खूप कठीण काळाचा सामना करावा लागत होता. त्यामधीलच एक अभिनेता म्हणजे अभिषेक बच्चन. अभिषेक बच्चनची बॉलीवूडमध्ये एन्ट्री होण्याआधीच बच्चन कुटुंब हे कठीण काळाचा सामना करत होत. (Entertainment News)
Car Accident । क्षणात होत्याच नव्हतं झालं, चालत्या कारवर ट्रक उलटला; संपूर्ण कुटुंब उध्वस्त
एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन याने सांगितले आहे की, “त्यावेळी कोणीही अभिषेकला लाँच करायची जबाबदारी घेत नव्हतं. तसेच या मुलाखतीमध्ये अभिषेकने त्याच्या कुटुंबाच्या कठीण काळाबद्दल देखील सांगितल आहे. वीस वर्षांपूर्वी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा होता. या सोहळ्याला संपूर्ण इंडस्ट्रीज एकत्र येतातते त्यावेळी एक प्रसंग असा होता तेव्हा मी विचार करत होतो की, या पुरस्कार सोहळ्यासाठी जायला कोणता ड्रेस परिधान करायचा. हे आता विचित्र वाटतय पण त्यावेळी माझ्याकडे इतके चांगले कपडे नव्हते. आम्हाला नवीन कपडे घेणे परवडत नव्हते. आम्ही एका कठीण काळातून जात असल्याचे अभिषेक बच्चन याने सांगितले आहे.
St Bus । एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सुट्ट्या पैशांचे टेन्शन मिटले
त्याचबरोबर पुढे बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला, “पुरस्कार सोहळ्यामध्ये परिधान करण्यासाठी माझ्याकडे फॉर्मल कपडे नव्हते. जीन्स आणि टी-शर्ट घालणे हे शहाणपणाचे लक्षण असेल असे मला वाटत नव्हते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी घेतलेली शेरवानी मी घातली आणि पुरस्कार सोहळ्याला गेलो असल्याचे अभिषेक बच्चनने सांगितले आहे.
Maratha Reservation । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगेंची सभा घेणाऱ्या ११ आयोजकांवर गुन्हा