बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानात देखील मोठे बदल होत आहेत. आतापर्यंत सर्वत्र ‘ऑनलाइन’ तंत्रज्ञानाचा बोलबाला होता. मात्र, आता चर्चा सुरुय ती AI ची ! Artificial Intelligence म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा डिजिटल युगातला सर्वात मोठा आणि क्रांतिकारक बदल आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपन्यांपासून ते अगदी छोट्या स्टार्टअप्स पर्यंत सर्वच व्यवसाय व उद्योगधंद्यांवर AI चा परिणाम झाला आहे. हे AI म्हणजे नक्की काय भानगड आहे ? AI चा उपयोग काय ? AI ची निर्मिती कधी आणि कोणी केली ? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊयात.
Artificial Intelligence (AI) म्हणजे काय ?
AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा कम्प्युटर सायन्सचा एक भाग असून यामध्ये संगणक प्रणाली माणसाच्या बुद्धिप्रमाणे काम करते. विस्तृतपणे सांगायचे झाल्यास, यंत्रांमध्ये आणि यंत्रांच्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये मानवी बुद्धीसारखी काम करण्याची क्षमता तयार करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. (Artificial Intelligence)
AI च्या माध्यमातून माणूस बुद्धीची जी कामे करतो ती कामे मशीनद्वारे सहज करता येतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र काही वृत्तवाहिन्यांवरील वृत्तनिवेदक देखील AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. माणूस ज्याप्रमाणे बुद्धीच्या जोरावर लिहितो, वाचतो, बोलतो, संवाद साधतो त्याचप्रमाणे AI देखील काम करते.
AI चा वापर कुठे केला जातो ?
तुम्ही कधी तुमच्या मोबाईल मधील गूगल असिस्टंटला सूचना देऊन तुमचे काम करवून घेतले आहे का ? एखाद्याला कॉल लावणे, मोबाईल मधील कोणतेही Application सुरू करणे, मोबाईलवर गाणी लावणे यांसारखी कामे गूगल असिस्टंट सहज करून देते. मित्रांनो, तुम्ही वापरणारे गूगल असिस्टंट हे देखील AI चेच उदाहरण आहे. एवढंच नाही तर आपल्या मोबाईलमधील गुगल लेन्स, AI कॅमेरा, Alexa हे सुद्धा AI द्वारे चालतात. डेटा अँनॅलिसीस, सुरक्षा, शॉपिंग, रिटेल व्यवसाय, उत्पादन, यांसारख्या अनेक क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा सर्रास वापर केला जातो.
Artificial Intelligence (AI) ची निर्मिती
कृत्रिम बुद्धिमान हे माणसाच्या अफाट कल्पनाशक्तीचे आणि बुद्धिमत्तेचे यश आहे. 1943 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात मॅकलॉक आणि पिट्स या संशोधकांनी मेंदुसारखे काम करणाऱ्या तंत्रज्ञानाची संकल्पना सादर केली. त्यानंतर जॉन मॅकार्थी यांनी 1955 मध्ये AI ही संकल्पना जगासमोर मांडली. विज्ञान – तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर करून बुद्धीमान यंत्रे बनवता येतील, असे त्यांनी म्हंटले होते.
Artificial Intelligence (AI) चे फायदे
1) उत्पादकता सुधारेल
2) ग्राहक सेवा सुधारण्यास मदत होईल
3) विविध क्षेत्रात क्रांती घडेल
4) मनुष्यबळाचा वापर कमी होईल
Artificial Intelligence (AI) चे तोटे
1) गोपनीयतेचे उल्लंघन
2) सायबर घोटाळे
3) चुकीची माहिती
4) मनुष्यबळाचा वापर कमी होऊन नोकऱ्यांच्या संधी कमी होतील