मुंबई : लोकसभेत सोमवारी वाढत्या महागाईवर चर्चा झाली. ही चर्चा दोन तासाची होती ह्याच्यात भाजप नेत्या सुषमा स्वराजयांचाही उल्लेख झाला. तृणमूल काँग्रेसच्या कोकीला घोष तसेच, लोकसभेत स्वराज्य विरोधी पक्षनेत्या होत्या. त्या महागाईवर नेहमी बोलत असे, सुप्रिया सुळेंनी स्वराज्य यांच्या लोकसभेतील वाक्याचा पुनरुचार केला. सामान्य माणसाला कधीही आकड्याचा खेळ कळत नाही, त्याच्या खिशाला किती टाच बसते हेच त्याला कळते. असे स्वराज्य म्हणल्या होत्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) त्याची आठवण करून दिली.
“दत्त, दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय, सायीचे लोणी, लोण्याचे तूप… यामध्ये केंद्र सरकारने फक्त दत्त आणि दत्ताची गाय या दोघांना जीएसटी लावलेला नाही. बाकी दूध, साय, सगळ्यावर जीएसटी आहे”. असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्री सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना लगावला
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पेन्सिलसाठी सुद्धा एका छोट्या चिमुकलीने नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. आता पेन्सिलवरही जीएसटी लागू झालेला आहे”. याशिवाय अनेक वेगवेळ्या बाबींची खरडपट्टी सुळेंनी या चर्चेमध्ये केली.
केंद्र सरकार आणि भाजप नेते कायम सांगत असतात शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होईल. पण खरंच शतकऱ्याचे उत्पन्न वाढले का? शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट होणाऱ्या आश्वासनावर केंद्र सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी सुळे यांनी लोकसभेत केली.