
Crime । पती पत्नीमधील वाद हा आपल्यासाठी काही नवीन नाही. पतिपत्नीमध्ये वाद हे कायम होतच असतात. मात्र वादानंतर ते दोघे परत आनंदाने बोलतात देखील. मात्र सध्या उत्तर प्रदेशातील बागपत येथून पती पत्नीच्या वादाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिथे एका पतीने आपल्या पत्नीला गरम चहा मागितला, पण यामुळे पत्नी इतकी चिडली की तिने चहा बाजूला ठेवला आणि थेट पतीच्या डोळ्यात कात्री खुपसली. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
Politics News । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकारणात भूकंप?
या गंभीर दुखापतेनंतर पती वेदनेने किंचाळत होता. मात्र तरीदेखील पत्नीला काही दया आली नाही. पतीला तशाच वेदनेत सोडून तिने घरातून पळ काढला आणि ती फरार झाली. यांनतर त्या इसमाच्या आरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य घरात आले आणि त्यानंतर त्यांनी इसमाला दवाखान्यात दाखल केले आणि याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पीडित इसमावर सध्या मेरठमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पत्नीने पतीच्या डोळ्यात कात्री खुपसली आणि त्यानंतर ती फरार झाली आहे. पकडले जाण्याच्या भीतीने ती घरातून पळाली आणि फरार झाली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, ते पुढील तपास करत आहेत.
Sharad Pawar । शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का! गटातील नेत्यावर पोलिसांत ॲट्रॉसिटीचा गुन्हा