
Maratha Reservation News । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारी रोजी पायी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या नोटिसांची परवा न करता आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार मराठा बांधवांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर मधून या दिंडीत 500 ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथून मराठा बांधवांनी पोलिसांनी दिलेल्या नोटिसा धुडकावून 500 ट्रक्टरसह दिंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गावागावात बैठका सुरू झाल्या आहेत. मुंबईमध्ये ट्रॅक्टर घेऊन येऊ नये यासाठी ट्रॅक्टर मालकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मात्र तरी देखील मराठा बांधव हे मुंबईला ट्रॅक्टर नेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, “छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 500 ते 700 ट्रॅक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. ट्रॅक्टर मालिकांनी पोलिसांच्या नोटिसा धुडकावून मनोज जररांगे यांच्या पायी दिंडीत ट्रॅक्टर नेण्याचे नियोजन सुरू केले आहे. (Maratha Reservation News )
Politics News । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकारणात भूकंप?