Accident News । अपघातामुळे अनेक जणांचे संसार उध्वस्त होतात. अपघाताच्या अनेक भीषण घटना दररोज समोर येत आहेत. सध्या देखील नागपूर मधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या बिडगाव परिसरामध्ये भरधाव डंपरने भाऊ-बहिणीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
Sunil Kedar । मोठी बातमी! सुनील केदार यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार
या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संतप्त जमावाने डंपर पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. नागपूर मधील बीडगाव परिसरामध्ये भरडाव डंपरने बहिण-भावाला चिरडल्याची घटना शुक्रवारी 29 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. यानंतर तेथील संतप्त जमावाने घटनास्थळी आक्रमक भूमिका घेत थेट डंपरलाच आग लावली.
ही आग लावल्यानंतर त्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर तेथील स्थानिक नागरिकांनी डंपर चालकावर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.