Ajit Pawar । सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र हे सर्व करत असतानाच आता अजित पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड मधील अजित दादा गटाच्या बड्या पदाधिकाऱ्याने ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे पदाधिकारी समजले जाणारे संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी पहाटेच वाघोरे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे आता अजित पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड हा शहर अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच ठिकाणी पदाधिकाऱ्याने साथ सोडल्याने अजित पवारांना आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
Pune Accident News । पुण्याच्या कात्रज बोगद्यात ५ गाड्यांचा अतिशय विचित्र अपघात, महिला जखमी