Trending News In Marathi । लहानांसह तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटची आवड आहे. यामुळे विद्यार्थी क्रिकेट खेळत असल्याचे दिसते. आपल्याकडे अनेक जण क्रिकेटचे चाहते आहेत. मात्र सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा या ठिकाणी ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. (Trending News In Marathi)
माहितीनुसार, क्रिकेट खेळत असताना विद्यार्थी थंड पाणी पेला आणि त्यानंतर त्याला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात जाईपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रिन्स सैनी असे या युवकाचे नाव असून तो शनिवारी मित्रांसोबत क्रिकेट खेळायला घेता होता गेला होता. यावेळी त्याचा मृत्यू झाला आहे.
Ajit Pawar । “अजितराव टोपी उड जाएगी”, बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा
क्रिकेट खेळून कंटाळा आल्यानंतर प्रिन्स त्याच्या बॉटलमधील असलेले थंड पाणी पिला आणि त्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो मैदानात कोसळला. यानंतर त्याचे मित्र त्याला पाहून घाबरले त्यानंतर मित्रांनी लगेचच कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. यानंतर त्याला लगेच रिक्षा मधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयांमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोटच्या लेकाचा असा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई न करता गंगा घाटावर त्यावर अंतिम संस्कार केल्याची माहिती देखील मिळत आहे. प्रिंसचा मृत्यू हा थंडीमुळे झाला असावा असा तर्क काही जणांनी लावला आहे तर काहीजण हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलत आहेत.
Aryan Arora । प्रसिद्ध अभिनेत्यावर केअर टेकरचा प्राणघातक हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, १० टाके पडले
प्रिन्स दहावीमध्ये शिकत असून तो एका इंटर महाविद्यालयात शिकत होता. त्याच्या पाठी एक भाऊ आणि एक बहीण देखील आहेत. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर त्याची बहिण भाऊ देखील खूप रडत आहेत.