Accident News । झारखंडमधून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकनिकला निघालेल्या तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आणि त्यानंतर ती अनियंत्रित झाल्याने थेट झाडाला जाऊन आदळली आणि हा भीषण अपघात झाला.
हा अपघात जमशेदपूर जिल्ह्यातील बिस्तुपुर परिसरात असलेल्या सर्किट हाऊस चौकाजवळ झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य केले.
Corona News । मोठी बातमी! महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण; धक्कादायक माहिती समोर
अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मृत तरुण आदित्यपुर आश्रम परिसरातील रहिवासी होते. नववर्षानिमित्त ते कारमधून पिकनिकसाठी निघाले होते. मात्र त्यांची कार बिस्तुपूर येथील सर्किट हाऊस चौकाजवळ आली असता चालकाचे करवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला.
Amruta Fadanvis । अमृता फडणीस यांनी हटके अंदाजात दिल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा; पहा व्हिडिओ