Aurangabad: “गावात फोर व्हिलर आणा व 51 हजार रुपये बक्षीस मिळवा”, औरंगाबाद जिल्ह्यात गावकऱ्यांची अजब ऑफर

"Bring a four wheeler to the village and get a prize of Rs 51 thousand", a strange offer of villagers in Aurangabad district

औरंगाबाद: आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आपण त्या गोष्टीचा शेवट करण्यासाठी काहीतरी टोकाची भूमिका घेतो. दरम्यान असच काहीस औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात घडलय. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील गंगागूर (Gangapur) तालुक्यातल्या आनंदवाडी गावकऱ्यांनी (villagers) रोजच्या त्रासाला कंटाळून एक अजब ऑफर (Offer) दिली आहे. ही अजब गजब ऑफर अशी आहे की, जर कुणी गावात फोर व्हिलर (Four Wheeler) घेऊन आला तर त्याला 51 हजार रुपये बक्षीस(51 thousand rupees prize) दिलं जाईल.

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर, असा असेल दौरा

रोजच्या त्रासाला कंटळून एकदम तळमळीने गावकऱ्यांनी ही घोषणा केली आहे. कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गावाकडे येणारा रस्ताच बांधण्यात आलेला नाही, अशी व्यथा या गावकऱ्यांनी सांगितली. स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत आनंदवाडी गावाला रस्ता न मिळाल्यामुळे आजही गावांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. या गावकऱ्यांना जगाशी संपर्क करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

आता ‘या’ रेशनकार्ड धारकांवर केंद्र सरकार करणार कारवाई, वाचा नवीन नियम

त्यामुळे या वैतागलेल्या गावकऱ्यांनी चक्क गावात चार चाकी घेऊन येणाऱ्या व्यक्तीसाठी 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. ही बातमी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरल्यानंतर या अजब ऑफरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु महत्वाचं म्हणजे परिणाम लोकप्रतिनिधीवर होईल का? आणि या गावाला रस्ता मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Rain: मुंबईसह रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *