Viral Video । 31 डिसेंबरला अनेक जण आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करतात. डान्स, दारू, जेवण हे सर्व 31 डिसेंबरला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 31 डिसेंबरला पार्टी करताना गोंधळ देखील होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घडतात. सध्या देखील 31 डिसेंबरला मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणीने थेट हॉटेलमध्येच राडा घातल्याची माहिती मिळत आहे. दारूच्या नशेमध्ये तरुणीने हॉटेलमधील लोकांना शिवीगाळ केली आहे.
Viral News | ‘साहेब थंडीचा त्रास होतोय, मला बायको पाहिजे…’; तरूणाने पोलिसात केली अजब तक्रार
ज्यावेळी तरुणी हॉटेलमधील लोकांना शिवीगाळ करत होती त्यावेळी त्या ठिकाणच्या एका वेटरने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने थेट वेटरच्या हाताला चावा घेतला. तरुणीच्या या कृत्यामुळे हॉटेलमधील लोक धास्तावले होते. त्यानंतर हॉटेलमधील स्टाफने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र दारूच्या नशेत असल्यामुळे ती कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान बाहेर जाणार आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. Ghar Ke Kalesh या X अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Ajit Pawar । पाणबुडी प्रकल्पावरून अजित पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
New year party kalesh
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 1, 2024
(This lady was shouting non stop after overdrunk at new year's party. Finally hotel staff took her out by lifting her)
Delhi pic.twitter.com/d36EY2FepL