Jitendra Awhad । प्रभू श्रीराम यांच्या विषयी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण स्तरातून दिसून येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता जालन्यामध्ये हिंदू महासभा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया हिंदू महासभेचे धनसिंह सूर्यवंशी यांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध सर्वच स्तरातून केला जात आहे. जालन्यामध्ये देखील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ हिंदू महासंघ आक्रमक झाले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयुद्ध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल अशी घोषणा हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी केली आहे.
Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट!
त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बुलढाणा या ठिकाणी देखील भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुलढाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आव्हाडांविरोधात मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. आक्रमक कार्यकर्त्यांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. यावेळी जवळपास 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Accidents Prone Time In India । भारतात सर्वाधिक अपघात कधी होतात? जाणून घ्या महत्वाची माहिती